गृह मंत्रालय
'इग्नाइटिंग कलेक्टिव गुडनेस: मन की बात @ 100' हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाची कथा सांगते : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2023 4:31PM by PIB Mumbai
'इग्नाइटिंग कलेक्टिव गुडनेस: मन की बात @100' हे नवीन पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाची कथा सांगते असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रभावशाली शब्दांनी राष्ट्राला कशाप्रकारे सर्वांच्या कल्याणासाठीचे समान उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एकत्र केले हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे असे अमित शाह यांनी एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.
माहिती आणि दूरदृष्टीने परिपूर्ण मन की बात कार्यक्रम आपला शंभराव्या भागाचा टप्पा ओलांडत असताना ज्या युवकांना एका परिवर्तनशील प्रवासावर चिंतन करण्याची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले
यावेळी त्यांनी हे साहित्य रत्न सर्वांसमोर आणल्याबद्दल पुस्तकाच्या प्रकाशकाचे अभिनंदन केले.
***
S.Kane/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968529)
आगंतुक पटल : 201