गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमधील सियालदह येथे दुर्गा पूजा पंडालचे केले उद्घाटन

Posted On: 16 OCT 2023 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमधील सियालदह येथे दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन केले.

  

यावेळी आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, आज मी दुर्गा मातेचा  आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे.माता  दुर्गा नेहमी सत्याच्या रक्षणासाठी लढली आणि  रक्तबीजपासून शुंभ-निशुंभापर्यंत अनेक राक्षसांचा वध केला, असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालसाठी हे  नऊ दिवस उत्सवाचे दिवस असतात जेव्हा  बंगालमधील सर्व पंडाल माता दुर्गेच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात असे शहा म्हणाले.

नवरात्रीच्या काळात संपूर्ण देश दुर्गामातेची वेगवेगळ्या रूपात पूजा करतो. गुजरातमध्ये,मंडप सजवून माता दुर्गेची   पूजा केली जाते, पूर्व भारतात लोक दुर्गा पूजा पंडालमध्ये शक्तीची पूजा करतात आणि उत्तर भारतातही लोक अनेक विधींद्वारे शक्तीची पूजा करतात, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. बंगालसह संपूर्ण देशातील जनतेला सुख, शांती आणि समृद्धी मिळावी यासाठी मी दुर्गा मातेची प्रार्थना करण्यासाठी आलो असल्याचे अमित शहा म्हणाले.बंगालमधून भ्रष्टाचार, अन्याय आणि अत्याचार लवकर संपवण्याचे बळ मिळावे यासाठी  दुर्गा मातेची  प्रार्थना केली असेही ते म्हणाले. अयोध्येत मंदिर पूर्ण होण्यापूर्वीच राममंदिराचा संदेश   हे दुर्गा पंडाल जगभर पसरवत आहे असे ते म्हणाले.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968234) Visitor Counter : 121