पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या
तसेच, शैलपुत्री देवीची प्रार्थनाही केली
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2023 8:44AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दुर्गा मातेला, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य येवो अशी प्रार्थनाही केली.
याशिवाय, पंतप्रधान मोदी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी, जनतेला बळ आणि समृद्धी मिळो अशी कामना केली.
आपल्या X वरील पोस्ट शुंखलेत पंतप्रधान म्हणतात;
“देशातल्या नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. शक्ती देणारी , माता दुर्गा प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. जय माता दी!”
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्री यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. देवी जवळ माझी प्रार्थना आहे की, माता आपण देशातल्या प्रत्येक नागरिकाला बळ आणि समृद्धीचा आशीर्वाद द्यावा.
***
MI/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967847)
आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam