पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 03 OCT 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.19-वर्षीय मुलीच्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो . तिचे सातत्य, निष्ठा  आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा हा दाखला आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी महिलांच्या 54 किलो वजनी गटात एका  प्रतिभावान मुष्टियोद्धयाच्या कठोर परिश्रमाने कांस्य पदक मिळवून दिले आहे.

प्रीती पवारच्या या  उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान वाटतो.तिचे सातत्य,समर्पण आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा हा दाखला आहे."

 N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1963865) Visitor Counter : 78