पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पुरुष संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2023 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात  सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे. सरबज्योत सिंह , अर्जुन सिंह  चीमा आणि शिवा नरवाल या नेमबाजांनी आपल्या अचूकतेचे  आणि कौशल्याचे प्रदर्शन  करत संपूर्ण देशासाठी  अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असे  मोदी यांनी म्हटले आहे.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

आशियाई क्रीडा स्पर्धेत  10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत आपल्या पुरुष संघाने लक्षणीय कामगिरी करत नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक पटकावले !  सरबज्योत सिंह , अर्जुनसिंह  चीमा आणि शिवा नरवाल यांनी आपल्या अचूकतेचे  आणि कौशल्याचे प्रदर्शन करत संपूर्ण देशासाठी  अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

 

* * *

NM/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1961673) आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam