पंतप्रधान कार्यालय
राज्यसभेतील सर्व सदस्य, पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना 128वी घटनादुरुस्ती विधेयक, 2023 ला पाठिंबा देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
“ या चर्चेमधील प्रत्येक शब्द आपल्या सर्वांसाठी आगामी काळातील संसदीय प्रवासात उपयुक्त ठरेल”
“ या चर्चेतील सर्व राजकीय पक्षांची भावना देशाच्या जनतेमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करेल”
Posted On:
21 SEP 2023 10:49PM by PIB Mumbai
128वी घटनादुरुस्ती विधेयक 2023 वरील चर्चेची सांगता करण्यासाठी पंतप्रधान राज्यसभेत उभे राहिले आणि सांगितले की गेले दोन दिवस दोन्ही सभागृहात अतिशय फलदायी चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत आणि सुमारे 132 सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. “ या चर्चेतील प्रत्येक शब्दाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आणि अर्थ आहे,” देशाच्या आगामी काळातील संसदीय प्रवासात या अर्थपूर्ण चर्चा अतिशय उपयुक्त असतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सदनातील सदस्यांच्या या विधेयकाला असलेल्या पाठबळाचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि म्हणाले, “ ही भावना देशातील जनतेमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल आणि सर्व सदस्य आणि सर्व राजकीय पक्षांनी एक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” या विधेयकाच्या संमतीमुळे महिला शक्तीला विशेष सन्मान मिळत आहे असे नाही तर या विधेयकाबाबतच्या सर्व पक्षांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे देशातील महिला शक्तीला एक नवी ऊर्जा प्राप्त होत आहे यावर त्यांनी भर दिला. हे विधेयक नेतृत्वासह एक पाऊल पुढे टाकेल आणि एका नव्या आत्मविश्वासाने राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देणार असल्याने ते भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हमी बनेल, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी या संपूर्ण विचारपूर्ण चर्चेमध्ये व्यक्त झालेल्या भावनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि हे विधेयक एकमताने संमत करण्याची वरिष्ठ सभागृहाला विनंती केली.
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1959599)
Visitor Counter : 254
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam