पंतप्रधान कार्यालय
लोकसभेत, संविधान (एकशे अठ्ठाविसावी दुरुस्ती) विधेयक, 2023 ला समर्थन आणि त्यावरील अर्थपूर्ण चर्चेसाठी सर्व सदस्य, पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे पंतप्रधानांनी मानले आभार
"देशाच्या संसदीय प्रवासातील हा एक सुवर्ण क्षण आहे"
"यामुळे मातृशक्तीची मनस्थिती बदलेल आणि त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी एक अकल्पनीय शक्ती म्हणून उदयास येईल"
प्रविष्टि तिथि:
21 SEP 2023 12:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान आणि सभागृहाचे नेते नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत, संविधान (एकशे अठ्ठाविसावी दुरुस्ती) विधेयक, 2023 ला दिलेल्या समर्थनाबद्दल आणि त्यावरील अर्थपूर्ण चर्चेबद्दल आज सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. नवीन संसद भवनातील कामकाजाचा पहिला महत्त्वाचा विषय म्हणून पटलावर मांडण्यात आलेल्या या विधेयकावर काल लोकसभेत चर्चा झाली आणि त्याला मंजुरी मिळाली.
आज सदनाचे कामकाज सुरू होताच पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि कालच्या कामकाजाचा ‘भारताच्या संसदीय लोकशाहीच्या प्रवासाचा सुवर्ण क्षण’ म्हणून उल्लेख केला आणि त्यांनी या कामगिरीचे श्रेय सर्व पक्षांच्या सदस्यांना आणि त्यांच्या नेत्यांना दिले. ते म्हणाले की, कालचा निर्णय आणि राज्यसभेत होणाऱ्या परमोच्य अशा आगामी ऐतिहासिक निर्णयामुळे मातृशक्तीची मनस्थिती बदलेल आणि त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी एक अकल्पनीय शक्ती म्हणून उदयास येईल. "हे पवित्र कार्य पूर्ण करण्यासाठी, मी, या सभागृहाचा नेता या नात्याने, तुमचे योगदान, समर्थन आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल माझ्या अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभा आहे", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
***
NM/ VY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1959329)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam