पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

प्रख्यात लेखिका आणि ओडिशाचे मुख्यमंत्री यांच्या भगिनी गीता मेहता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 17 SEP 2023 9:24AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात लेखिका आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या भगिनी गीता मेहता यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

आपल्या एका x वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

प्रख्यात लेखिका श्रीमती गीता मेहता जी यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले. त्या एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होत्या, ज्या त्यांच्या बुद्धिमत्ता आणि लेखन कौशल्य तसेच चित्रपट निर्मितीच्या आवडीसाठी ओळखल्या जायच्या. त्यांना निसर्ग आणि जलसंधारणाची विशेष आवड होती. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना @Naveen_Odisha जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहेत. ओम शांती.

***

M.Iyengar/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1958127) Visitor Counter : 48