शिक्षण मंत्रालय
नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रात समान आणि शाश्वत शिक्षणाप्रति जगाच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार - धर्मेंद्र प्रधान
भारताच्या G20 अध्यक्षतेने ग्लोबल साउथचा आवाज मजबूत केला आहे -धर्मेंद्र प्रधान
Posted On:
11 SEP 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी20 च्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल,तसंच या पृथ्वीवर एकत्र राहणाऱ्या या एक कुटुंबासाठी एक भविष्य या भारताच्या 'वसुधैव कुटुंबकम' च्या कालातीत भावनेला अनुसरून मानव-केंद्रित दृष्टीकोन राखल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.आफ्रिकन संघाचा या प्रतिष्ठित गटात यशस्वी समावेश करून, जी20चे खरे लोकशाहीकरण करणारा आणि ग्लोबल साउथच्या आवाजाला बळ देणारा सर्वसमावेशक दृष्टिकोन भारताच्या नेतृत्वात साकार झाला आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात प्रधान म्हणाले की, सहमती, सहयोग आणि सहकार्यावर आधारित जागतिक व्यवस्थेबद्दल भारताच्या अध्यक्षतेची प्रशंसा केली जात आहे.
जी20 अंतर्गत शैक्षणिक प्राधान्यांबद्दल बोलताना प्रधान म्हणाले की, नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण, आजीवन शिक्षणासाठी क्षमता निर्मिती, कामाचे भविष्य आणि सहकार्याच्या माध्यमातून संशोधन आणि नवोन्मेष बळकटीकरण यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांवर विचारविनिमय करण्यास प्राधान्य देऊन शिक्षणाद्वारे न्याय्य आणि शाश्वत भविष्यासाठी काम करण्याच्या जागतिक संकल्पाला नव्याने उभारी दिली आहे आणि त्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, नेत्यांचे घोषणापत्र डिजिटल परिवर्तन,न्याय्य हरित संक्रमण आणि महिलाप्रणित विकास या तीन घटकांच्या शैक्षणिक कार्यगटाच्या प्राधान्यांशी सुसंगत आहे.
शिक्षण मंत्र्यांनी नेत्यांच्या घोषणापत्रात समाविष्ट असलेल्या शिक्षणासंबंधी पुढील मुद्दे अधोरेखित केले :
- आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तनासाठी आणि 21 व्या शतकातील आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ विकासाला सहाय्यक गुंतवणूकीचे महत्त्व ओळखले आहे.
- शाश्वत विकास उद्दिष्ट 4 (दर्जेदार शिक्षण) प्रति वचनबद्धतेचा भाग म्हणून, शाळांच्या भूमिकेवर आणि सर्व विद्यार्थ्यांची विशेषत: वंचित विद्यार्थ्यांची नावनोंदणी आणि त्यांची संख्या टिकवून ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे.
- 2030 पर्यंत सर्व विद्यार्थी मूलभूत कौशल्ये आत्मसात करतील हे सुनिश्चित करण्यासाठी त्वरित आणि सामूहिक कारवाईची गरज
- शिक्षणामध्ये डिजिटल आणि तंत्रज्ञान संबंधी उपायांच्या वापरातील उदयोन्मुख कल आणि बदलते स्वरूप
- सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास आणि डिजिटल परिवर्तन यांच्याशी संरेखित कौशल्य विकासासाठी एका एकीकृत आराखड्याची आवश्यकता ओळखून घोषणापत्रात स्कीलिंग, रीस्किलिंग आणि अपस्किलिंगवर लक्ष केंद्रित करून आयुष्यभर शिकत राहण्याच्या संकल्पावर भर देण्यात आला आहे.
- पीएमकेव्हीवाय,विद्यापीठांमधील कौशल्य केंद्रे आणि इतर कार्यक्रमांद्वारे आम्ही हे करत आहोत.
- घोषणापत्रात संयुक्त/दुहेरी पदवी कार्यक्रम, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची वर्धित गतिशीलता यांसारख्या संयुक्त शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांद्वारे उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन आणि नवोन्मेष यातील सहकार्य मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केलं आहे.
जी 20 शिक्षण कार्यगटाच्या बैठकींच्या पुढील पाठपुराव्याबाबत बोलताना प्रधान यांनी सांगितले की अनेक देशांसोबत संशोधन सहकार्य सक्रियपणे केले जात आहे.
प्रधान यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेने आपले शिक्षणविषयक प्राधान्यक्रम, संबंधित वास्तविकता आणि राष्ट्रीय उपक्रमाना चालना आणि दीर्घकालीन पद्धतशीर धोरणात्मक दृष्टी प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ दिले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि अभिनव दृष्टीकोन व्यापक करून भारत आणि त्याच्या जी 20 भागीदार देशांनी भविष्यकालीन शिक्षण आणि प्रशिक्षण प्रणालींवर समन्वित कृती करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956484)
Visitor Counter : 146