पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठक
Posted On:
10 SEP 2023 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतल्या जी- 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.
भारताच्या यशस्वी जी-20 अध्यक्षपदाबद्दल लुला यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. पुढच्या वर्षी जी-20 चे अध्यक्षपद ब्राझीलकडे असून, त्याच्या आयोजनासाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष लुला यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, या आयोजनात भारत पूर्ण सहकार्य करेल, असंही आश्वस्त केलं.
यावेळी दोन्ही नेत्यांमधे, जैव-इंधन, औषधनिर्माण उद्योग , कृषी-आधारित उद्योग, अवकाश आणि विमान वाहतूक यासह भारत - ब्राझील यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.
बैठकीनंतर, एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956149)
Visitor Counter : 160
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam