पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        G20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाट इथे महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                10 SEP 2023 12:26PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात: पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 
पंतप्रधानांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले की:
“शांतता, सेवा, करुणा आणि अहिंसेचे दीपस्तंभ असलेल्या महात्मा गांधी यांना ऐतिहासिक राजघाटावर G20 परिवाराने आदरांजली वाहिली.
राष्ट्रांची वैविध्ये एकत्र येत असताना, गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी  मार्गदर्शन करतात.”
 
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले की:
“G20 परिवार बापूंना आदरांजली अर्पण करत आहे. जागतिक नेत्यांनी राजघाटाला भेट देत महात्मा गांधी यांच्या समाधीला  आदरांजली अर्पण केली.”
 
***
S.Thakur/S.Naik CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1956011)
                Visitor Counter : 230
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam