महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय पोषण माह 2023 च्या पहिल्या दिवशी देशभरात जवळपास 10 लाख उपक्रमांचे आयोजन

Posted On: 04 SEP 2023 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2023

 

महिला आणि बाल विकास मंत्रालय संपूर्ण सप्टेंबर 2023 महिन्यात 6 वा राष्ट्रीय पोषण माह साजरा करत आहे. राष्ट्रीय  पोषण माह 2023 च्या पहिल्या दिवशी देशभरात 'मिशन लाईफ'च्या( पर्यावरणासाठी जीवनशैली) माध्यमातून पोषण सुधारणे' आणि 'केवळ स्तनपान आणि पूरक आहार' यासारख्या संकल्पनांसह  सुमारे 10 लाख उपक्रम आयोजित केल्याचे आढळून आले.

सुपोषित भारताच्या दिशेने  या जनआंदोलनात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याची गरज आहे.

राष्ट्रीय पोषण माह 2023 च्या उद्घाटनप्रसांगी देशभरातील अधिकारी आणि अंगणवाडी कर्मचारी  आहारात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पोषण अनुकूल वर्तनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी या महत्त्वाच्या कार्याप्रति वचनबद्धतेचा संकल्प केला.

मिशन पोषण  2.0 चा महत्वपूर्ण घटक असलेल्या जीवन-चक्र दृष्टिकोनाच्या माध्यमातून कुपोषणाचा व्यापक रीतीने सामना करणे हे यंदाच्या पोषण माह   2023 चे उद्दिष्ट आहे.  गर्भधारणा, बाल्यावस्था, बालपण आणि किशोरावस्था या मानवी जीवनातील महत्वपूर्ण  टप्प्यांबद्दल व्यापक जागरूकता निर्माण  करणे या बाबी पोषण माह 2023 च्या केंद्रस्थानी आहेत.  "सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत"  यावर आधारित संकल्पनेद्वारे देशभरात पोषणाचे महत्व पटवून देणे हा यामागचा उद्देश आहे.

महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात स्तनपान आणि पूरक आहार यासारख्या महत्त्वाच्या संकल्पनांवर केंद्रित मोहिमांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत  पोषणविषयी जागरूकता वाढवण्यासाठी देशभरात एकत्रितपणे प्रयत्न केले जातील.

 

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954599) Visitor Counter : 344