पंतप्रधान कार्यालय
कर्करोग बरा करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याकरिता होणाऱ्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
01 SEP 2023 8:11AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्करोग बरा करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याकरिता होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
एका एक्स पोस्टमध्ये केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी ईएसआय महामंडळाच्या 191व्या बैठकीत देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरेपी सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले;
“ कर्करोग बरा करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीचे हे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. देशभरातील अनेक लोकांना त्याचा फायदा होईल.”
— नरेंद्र मोदी (@narendramodi) सप्टेंबर 1, 2023
***
Jaidevi PS/S Patil/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1953962)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam