पंतप्रधान कार्यालय
गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्याने आपल्या भगिनींचे जीवन अधिक सुकर होईल : पंतप्रधान
पंतप्रधानांनी सर्व एलपीजी ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचे उचलले धाडसी पाऊल
Posted On:
29 AUG 2023 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2023
सर्व एलपीजी ग्राहकांसाठी म्हणजेच 33 कोटी गॅस जोडण्यांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणीत करणारा दिवस असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात सिलेंडरमागे 200 रुपयांचे अनुदान मिळत राहील.
सरकारने 75 लाख अतिरिक्त पीएम उज्ज्वला जोडण्यांना देखील मंजुरी दिली आहे, यामुळे एकूण पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या 10.35 कोटी पर्यंत पोहोचणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या X शृंखलेला उत्तर देताना, पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणित करणारा दिवस असतो. गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे माझ्या कुटुंबातील भगिनींना दिलासा मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. माझी प्रत्येक बहीण आनंदी, निरोगी, सुखी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.''
अधिक माहितीसाठी: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1953278
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953334)
Visitor Counter : 179
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam