पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मोझांबिक प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींची पंतप्रधानांनी घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 24 AUG 2023 11:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने मोझांबिक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष फिलिप जॅसिंटो न्युसी यांची भेट घेतली.

द्विपक्षीय संबंध पुढे कसे नेता येतील यावर उभय नेत्यांनी फलदायी चर्चा केली. चर्चेतील प्रमुख मुद्द्यांमध्ये संसदीय संपर्क, संरक्षण, दहशतवाद, ऊर्जा, खाणकाम, आरोग्य, व्यापार आणि गुंतवणूक, क्षमता बांधणी, सागरी सहकार्य तसेच दोन्ही देशातील जनतेचा परस्पर संबंध यांचा समावेश होता.

व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिटमध्ये राष्ट्राध्यक्ष न्युसी यांच्या सहभागाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष न्युसी यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आणि आफ्रिकी महासंघात जी20 च्या कायम सदस्यत्वासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

***

Jaydevi PS/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1952045) आगंतुक पटल : 116
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam