पंतप्रधान कार्यालय

20 वर्षांखालील वयोगटातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय महिला कुस्ती संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 19 AUG 2023 6:48PM by PIB Mumbai

 

20 वर्षांखालील वयोगटातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2023 जिंकल्याबद्दल भारतीय महिला कुस्ती संघाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी  वर पोस्ट केले:

"भारतीय महिला कुस्तीपटूंसाठी एक संस्मरणीय विजय!  आपल्या महिला कुस्ती संघाने,  2023 U-20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी 3 सुवर्णपदकांसह  7 पदके पटकावत अतुलनीय कामगिरी केली आहे.  आपले विजेतेपद कायम राखत अंतिमने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली असून तिची कामगिरी संस्मरणीय कामगिरींपैकी आहे! हा शानदार विजय आपल्या उदयोन्मुख कुस्तीपटूंची अतूट वचनबद्धता, निखालस दृढनिश्चय आणि अनन्यसाधारण प्रतिभेचे मूर्त रूप आहे."

***

M.Pange/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950506) Visitor Counter : 121