पंतप्रधान कार्यालय
जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
15 AUG 2023 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023
77व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आम्ही जी-20 शिखर परिषदेसाठी ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना मांडली आणि या दिशेने काम करत आहोत. जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आहे आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला आहे.
पंतप्रधान म्हणाले की आम्ही जगासोबत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार केली आणि आता अनेक देश या आघाडीचा भाग बनले आहेत. आम्ही जैवविविधतेवर भर दिला आहे आणि बिग कॅट आघाडी स्थापन केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
* * *
S.Bedekar/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949189)
Visitor Counter : 148
Read this release in:
Bengali
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam