पंतप्रधान कार्यालय

जागतिक गज दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी हत्तींच्या संरक्षणाप्रति वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

Posted On: 12 AUG 2023 9:44PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गज दिनानिमित्त हत्तींच्या संरक्षणाप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

जागतिक गज  दिनाच्या निमित्ताने आपण भारताच्या समृद्ध नैसर्गिक वारशाशी घट्ट जोडल्या गेलेल्या हत्तींच्या संरक्षणाप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे देखील मी कौतुक करतो. मुदुमलाई व्याघ्र अभयारण्याला  मी अलिकडेच भेट दिली होती त्याची झलक सामायिक करत आहे.🐘"

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948230) Visitor Counter : 108