पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अधिक सुविधांसह कल्याणकारी योजना निवृत्त सैनिकांचे जीवनमान सुधारतील :पंतप्रधान

Posted On: 11 AUG 2023 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की निवृत्त सैनिकांसाठी (ईएसएम) सुधारित कल्याणकारी योजना लागू करण्याच्या केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे या सैनिकांचे जीवनमान सुधारेल.

देशाच्या सैन्यदलांतून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा हेतू आणि त्यांचे जीवन अधिक सुलभ करण्याचे धोरण यांना अनुसरुन, निवृत्त सैनिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

  1. हवालदार किंवा समकक्ष पदापर्यंतच्या ईएसएमच्या विधवांना 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे व्यावसयिक प्रशिक्षण अनुदान .
  2. हवालदार किंवा समकक्ष पदापर्यंतच्या निवृत्तीवेतन धारक नसलेल्या ईएसएम किंवा त्यांच्या विधवांना 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे वैद्यकीय मदत अनुदान.
  3. सर्व श्रेणीतील निवृत्तीवेतन धारक नसलेल्या ईएसएम किंवा त्यांच्या विधवांना गंभीर आजारावरील उपचारासाठी सव्वा लाख ते दीड लाख रुपयांपर्यंतचे मदत अनुदान.

यावर प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;

सेवेत असताना आपल्या देशासाठी लढलेल्या शूर सेवानिवृत्तांचा भारताला अभिमान आहे. त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेल्या अधिक सुविधांसहित कल्याणकारी योजनांमुळे त्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारेल.

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948001) Visitor Counter : 106