पंतप्रधान कार्यालय

राजस्थानमधील पंतप्रधानाच्या कार्यक्रमात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे ट्वीट

Posted On: 27 JUL 2023 10:42AM by PIB Mumbai

पंतप्रधान कार्यालयाने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यानी राज्यात होत असलेल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील स्वतःच्या उपस्थितीबाबत केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देण्यासाठी पुढील ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकर येथे भेट देणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहेः

"श्री @ashokgehlot51 जी,

राजशिष्टाराला अनुसरून तुम्हाला निमंत्रित करण्यात आले आहे आणि तुमचे भाषण देखील नियोजित होते. पण तुमच्या कार्यालयाने तुम्ही सहभागी होऊ शकणार नाहीत असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वीच्या भेटींदरम्यानही तुम्हाला नेहमीच निमंत्रण देण्यात आलेले आहे आणि तुम्ही देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांची शोभा वाढवली आहे.

आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे. विकासकामांच्या नामपट्टिकेवर देखील तुमचे नाव आहे.

तुम्हाला अलीकडेच झालेल्या दुखापतीमुळे तुम्हाला काही शारीरिक समस्या नसेल तर तुमची उपस्थिती अतिशय बहुमूल्य असेल.”

***


Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943146) Visitor Counter : 104