पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला आहे : पंतप्रधान

Posted On: 14 JUL 2023 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे कौतुक केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने  केलेले ट्विट सामायिक करत  पंतप्रधानांनी ट्विट केले;

चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये  एक नवीन अध्याय लिहिला आहे . प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत उंच भरारी  घेतली आहे.

ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची  साक्ष  आहे. त्यांच्या धाडसाला आणि कुशाग्र बुद्धिमत्तेला  मी सलाम करतो!  

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1939469) Visitor Counter : 206