पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बर्लिनमधील विशेष ऑलिम्पिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेतील कामगिरीबद्दल खेळाडूंचे केले अभिनंदन

Posted On: 28 JUN 2023 9:38AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमधील विशेष ऑलिम्पिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत 76 सुवर्ण पदकांसह 202 पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“बर्लिनमधील विशेष ऑलिम्पिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून 76 सुवर्ण पदकांसह 202 पदके जिंकणाऱ्या आपल्या अतुलनीय खेळाडूंचे अभिनंदन. त्यांच्या यशामध्ये, आपण सर्वसमावेशकतेची भावना साजरी करत आहोत आणि या उल्लेखनीय खेळाडूंच्या चिकाटीचे कौतुक करत आहोत.”

***

SThakur/SKane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935811) Visitor Counter : 135