पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेतील विचारवंत, अभ्यासक आणि लेखक, प्रा. निकोलस तालेब यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2023 11:11AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2023
अमेरिकेतील सुप्रसिद्ध विचारवंत, गणित आणि सांख्यिकीचे अभ्यासक, शिक्षणतज्ञ आणि लेखक, प्रा. निकोलस तालेब यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सार्वजनिक क्षेत्रातील विचारवंत आणि अभ्यासक या नात्याने, जोखीम तसेच अस्थिरता अशा गुंतागुंतीच्या संकल्पना समाजासमोर मांडून, त्यावर चर्चा घडवून आणण्यात, तालेब यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
प्रा. तालेब यांच्यासोबतच्या संभाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील युवा उद्योजकांच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमता आणि भारतात विकसित होत असलेली स्टार्ट अप व्यवस्था, यावर भर दिला.
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933865)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam