पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवान यांनी पंतप्रधानांना अमेरिका- भारतादरम्यान विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य विषयक प्रगतीची माहिती दिली
पंतप्रधान मोदी यांचे अमेरिकेत स्वागत करण्यास राष्ट्राध्यक्ष जो बायडन उत्सुक असल्याची सुलिवान यांची माहिती
भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी दिवसेंदिवस वृध्दींगत आणि दृढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले समाधान
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत संवाद साधण्यास आपणही उत्सुक असल्याची पंतप्रधानांनी व्यक्त केली भावना
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2023 10:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2023
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
एन एस ए सुलिवान यांनी पंतप्रधान मोदी यांना दोन्ही देशातील विविध क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्य विषयक प्रगतीची माहिती दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत, असेही सुलीवान यांनी सांगितले.
दोन्ही देशातील सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी दिवसेंदिवस अधिक वृध्दींगत आणि दृढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत परस्पर हिताच्या विविध द्विपक्षीय,प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यास आणि अमेरिकेचा दौरा अधिकाधिक फलदायी करण्यास आपण उत्सुक आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932147)
आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam