पंतप्रधान कार्यालय
शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या जी 20 जनभागीदारी कार्यक्रमातील विक्रमी लोकसहभागाबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
10 JUN 2023 7:53PM by PIB Mumbai
शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या जी 20 जनभागीदारी कार्यक्रमातील विक्रमी लोकसहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
भारताच्या ही 20 अध्यक्षतेचा केंद्रबिंदू म्हणून, शिक्षण मंत्रालय विशेषत: संमिश्र शिक्षणाच्या संदर्भात, ''मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे (एफएलएन )” या संकल्पनेचा प्रचार आणि समर्थन करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करत आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि समुदायातील सदस्यांसह 1.5 कोटींपेक्षा जास्त व्यक्ती आतापर्यंत या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या आहेत.
शिक्षण मंत्रालयाच्या ट्विट शृंखलेला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;
“या विक्रमी सहभागाने रोमांचित झालो. सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी आपला सामायिक दृष्टीकोन यामुळे अधिक बळकट होतो. ज्यांनी यात भाग घेतला आणि भारताच्या जी -20 अध्यक्षपदाला बळ दिले, त्या सर्वांचे अभिनंदन.
***
M.Pange/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931395)
Visitor Counter : 177
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam