पंतप्रधान कार्यालय
अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या बाबतीत भारतीय निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट: पंतप्रधान
Posted On:
10 JUN 2023 4:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय नागरिकांमध्ये नवोन्मेषाबाबत असलेल्या उत्साहाचे आणि त्यांच्यातील उत्तम अनुकूलन क्षमतेचे कौतुक केले आहे तसेच आगामी काळातही हा वेग कायम ठेवण्यासाठीच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
डिजिटल पेमेंट क्षेत्रात देशाने केलेल्या प्रगतीबद्दल एका नागरिकाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या बाबतीत भारतातील लोक निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट ठरतात! त्यांनी नवोन्मेषाबाबत उत्साह आणि उत्कृष्ट अनुकूलता दर्शविली आहे. हा बदल संपूर्ण भारतभर दिसून येतो आहे आणि आम्ही हा वेग आगामी काळातही असाच कायम ठेवू."
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931311)
Visitor Counter : 178
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada