पंतप्रधान कार्यालय

जम्मू आणि काश्मीरमध्ये लॅव्हेंडरच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 09 JUN 2023 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बातमधून लॅव्हेंडरबाबत सांगणारी एक क्लिप सामायिक  केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लॅव्हेंडरच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले.

"जम्मू आणि काश्मीरमध्ये लॅव्हेंडर लोकप्रिय होत असल्याचे पाहून आनंद झाला. नुकत्याच झालेल्या मन की बात #MannKiBaat कार्यक्रमादरम्यान मी हा विषय अधोरेखित केला होता. youtu.be/kkbQzipkqrA"

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931183) Visitor Counter : 86