पंतप्रधान कार्यालय
ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
09 JUN 2023 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा ओपन एआय़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
''सॅम अल्टमन, तुमच्याशी झालेल्या सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चेबद्दल धन्यवाद. भारताची तंत्रज्ञानविषयक परिसंस्था विस्तारण्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता निश्चितच खूप मोठी असून विशेषतः युवावर्गामध्ये ती अधिक आहे. आमच्या नागरिकांना सक्षम करण्यासाठी आमच्या डिजिटल संक्रमणाला गती देऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो.''
* * *
S.Kakade/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930923)
Visitor Counter : 203
Read this release in:
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam