पंतप्रधान कार्यालय

जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर 2022-23चे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचे आकडे भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता विशद करतात

Posted On: 31 MAY 2023 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

देशाच्या अर्थव्यवस्थेची आशादायक वाटचाल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022-23 च्या सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीच्या आकडेवारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी केलेले ट्विट:

"जागतिक पातळीवरच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर 2022-23 च्या जीडीपी वाढीचे आकडे भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता दाखवतात. एकूणच आशावाद आणि आकर्षक व्यापक अर्थव्यवस्थेच्या निर्देशांकासह ही उत्तम कामगिरी आपल्या अर्थव्यवस्थेच्या आश्वासक मार्गाचे आणि लोकांच्या दृढतेचे द्योतक आहे."

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928834) Visitor Counter : 116