पंतप्रधान कार्यालय
कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
दोन्ही देशांमधील दृढ सांस्कृतिक संबंध आणि विकास भागीदारीवरील विचारांची देवाणघेवाण
भारताच्या G-20 अध्यक्षपदाची राजे नोरोडोम सिहामोनी यांनी केली प्रशंसा आणि दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2023 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2023
कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी यांनी आज राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कंबोडियाचे राजे सिहामोनी, 29-31 मे 2023 दरम्यान पहिल्यांदाच भारत भेटीसाठी आले आहेत.
पंतप्रधान आणि राजे सिहामोनी यांनी दोन्ही देशांदरम्यानचे सखोल सांस्कृतिक संबंध आणि परस्परांच्या जनतेमधील दृढ संबंध याबाबत चर्चा केली.
कंबोडिया बरोबर क्षमता विकासासह विविध क्षेत्रांमधील भागीदारी मजबूत करण्याच्या भारताच्या संकल्पाची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. विकास सहकार्यामध्ये भारताने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल राजे सिहामोनी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारताच्या G-20 अध्यक्षपदाबद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्या.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928430)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam