पंतप्रधान कार्यालय

नवीन संसद भवनाची वास्तू  प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी : पंतप्रधान


संसद भवनाच्या वास्तूची झलक दाखवणाऱ्या व्हिडीओवर नागरिकांनी आपल्या  भावना आपल्या  आवाजात व्यक्त करण्याचे केले आवाहन

Posted On: 26 MAY 2023 6:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या वास्तूची  झलक दाखवणारा व्हिडीओ  सामायिक  केला आहे.  त्या व्हिडीओसाठी  नागरिकांनी आपल्या आवाजात  आपले विचार रेकॉर्ड करावेत असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी म्हटले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:

"नवीन संसद भवनाची वास्तू  प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी आहे.  या  व्हिडीओ  या प्रतिष्ठित भवनाची झलक आहे. माझी एक विशेष विनंती आहे- हा व्हिडीओ आपल्या आवाजात  सामायिक करावा, ज्यामध्ये आपल्या विचारांचे प्रतिबिंब  असेल.  आलेल्या व्टिटपैकी  काहींना मी पुन्हा ट्विट करेन. हे करताना  #MyParliamentMyPride वापरण्यास विसरू नका."

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927595) Visitor Counter : 97