पंतप्रधान कार्यालय
खासदार आणि माजी मंत्री रत्तनलाल कटारिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
18 MAY 2023 10:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि माजी मंत्री रत्तन लाल कटारिया यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"खासदार आणि माजी मंत्री रत्तन लाल कटारिया जी यांच्या निधनाने व्यथित झालो. सार्वजनिक सेवा आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानासाठी त्यांचे कायम स्मरण केले जाईल. त्यांनी हरियाणात भाजपला मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबिय आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती."
***
Jaidevi PS / Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925135)
Visitor Counter : 166
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam