पंतप्रधान कार्यालय

भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि आपल्या भाषणांचे संकलन असलेली पीआयबी ची पुस्तिका पंतप्रधानांनी शेअर केली

Posted On: 19 APR 2023 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता नवी दिल्ली इथे जागतिक बौद्ध शिखर परिषदेला संबोधित करतील.

पंतप्रधानांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने तयार केलेली एक पुस्तिका शेअर केली असून, यामध्ये  पंतप्रधानांची भाषणे आणि भगवान बुद्धांचे प्रमुख विचार आणि बौद्ध विचारांचे संकलन आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या ट्विटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:

"उद्या, 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, दिल्लीतील जागतिक बौद्ध शिखर परिषदेला संबोधित करणार आहे. ही परिषद भगवान बुद्धांच्या आदर्शांना आणखी लोकप्रिय करण्यासाठी काम करणाऱ्या अनेक लोकांना एकत्र आणेल."

पुस्तिका येथे पाहता येईल.   

English booklet 

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/apr/doc2023419182601.pdf

Hindi booklet 

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/apr/doc2023419182701.pdf

G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918106) Visitor Counter : 144