पंतप्रधान कार्यालय
20 एप्रिलला होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित
“समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास” ही परिषदेची संकल्पना आहे
जगभरातील मान्यवर विद्वान, महासंघ नेते आणि धम्म अनुयायी होणार या परिषदेत सहभागी
Posted On:
18 APR 2023 10:58AM by PIB Mumbai
दिल्लीमध्ये 20 एप्रिल रोजी हॉटेल अशोक येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचा विषय आहे-“ समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास”. बौद्ध धम्म आणि जागतिक समस्यांबाबत जागतिक पातळीवरील बौद्ध धम्मामधील नेतृत्व आणि विद्वान यांच्यात परस्परसंवाद घडवून आणण्याच्या आणि एकत्रितपणे त्यावर तोडगे काढण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचे अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्माची मूलभूत मूल्ये समकालीन घडामोडींमध्ये कशा प्रकारे प्रेरक आणि मार्गदर्शक ठरू शकतात यावर शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. जगभरातील मान्यवर विद्वान, महासंघ नेते आणि धम्म अनुयायी या परिषदेत सहभागी होणार आहेत आणि ते जागतिक मुद्यांवर चर्चा करतील आणि त्याबाबत सार्वत्रिक मूल्यांवर आधारित असलेल्या बौद्ध धम्मामध्ये उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील. ही चर्चा प्रामुख्याने चार विषयांवर आयोजित करण्यात येईल. पर्यावरणीय संकट, आरोग्य आणि शाश्वतता, नालंदा बुद्धिस्ट परंपरेचे जतन, बौद्ध धम्म तीर्थयात्रा, परंपरागत वारसा आणि बुद्धांचे अवशेषः दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशियायी देशांशी भारताच्या अनेक शतके प्राचीन सांस्कृतिक संबंधांचा एक मजबूत पाया.
***
JPS/SPatil/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917558)
Visitor Counter : 231
Read this release in:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam