पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रातील रायगड येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीडितांसाठी पंतप्रधान मदत निधीतून मदत जाहीर
Posted On:
15 APR 2023 1:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील रायगड येथे बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"महाराष्ट्रातील रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी आशा आहे. राज्य सरकार बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे: पंतप्रधान"
"रायगडमधील बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1916906)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam