पंतप्रधान कार्यालय

ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची 60% व्याप्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून संतोष व्यक्त


ही उल्लेखनीय कामगिरी असून ती अनेकांना सक्षम करेल- पंतप्रधान

Posted On: 04 APR 2023 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण घरांमध्ये  नळाद्वारे पाणीपुरवठ्याची  60% व्याप्ती  झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि यामुळे अनेकजण सक्षम होतील असे म्हटले आहे. आगामी काळात ही व्याप्ती अधिक वेगाने वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;

"ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि ती अनेकांना सक्षम करेल. आगामी काळात ही  व्याप्ती आणखी वेगवान करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913691) Visitor Counter : 152