पंतप्रधान कार्यालय
पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंशासित लँडिंग मिशन संचलित करणाऱ्या इसरोचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
02 APR 2023 8:18PM by PIB Mumbai
इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंशासित लँडिंग मिशन संचलित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसेच भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने इस्रोने 2 एप्रिल 2023 रोजी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंशासित लँडिंग मिशन यशस्वीरित्या पार पाडले.
इस्रोच्या ट्विट थ्रेड्सला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“एक उत्तम सांघिक प्रयत्न. या यशाने आपल्याला पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण यान साकारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल जवळ नेले आहे.”
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1913149)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam