पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

”बंगळुरू शहराचे वृक्ष आणि तलावांबरोबरच निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे: पंतप्रधान

Posted On: 01 APR 2023 9:33AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बंगळुरू शहराचे वृक्ष आणि तलावांबरोबरच निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे.

निसर्ग प्रेमी, माळी आणि कलाकार असलेल्या श्रीमती सुभाषिनी चंद्रमणी यांनी बेंगळुरूमधील विविध वृक्षांच्या संग्रहाच्या तपशीलवार वर्णनाबद्दल केलेल्या ट्विट श्रुंखलेला  उत्तर देताना, पंतप्रधानांनी इतर लोकांनाही त्यांच्या शहरांचे आणि गावांचे असे पैलू इतरांशी सामायिक करावेत असे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“ हे बेंगळुरू आणि इथे असलेल्या वृक्षांच्या नात्यामधला एक  नाजूक धागा आहे. बंगळुरू शहराचे वृक्ष आणि तलावांबरोबर निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे.

मी इतरांनाही त्यांच्या गावांचे आणि शहरांचे असे पैलू दाखविण्याचा आग्रह करेन. असे वाचन खरोखरच मनोरंजक ठरू शकेल. ”

>

****

MI/VikasY/CY


(Release ID: 1912810) Visitor Counter : 193