पंतप्रधान कार्यालय

एसटी संगमम हा गुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन बंध साजरा करणारा उत्सव: पंतप्रधान

Posted On: 19 MAR 2023 8:49PM by PIB Mumbai

 

एसटी म्हणजेच सौराष्ट्र तामिळ संगमम अंतर्गत गुजरात आणि तामिळनाडू या दोन राज्यातील प्राचीन बंध साजरे केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.  हा एसटी संगमम, एक भारत, श्रेष्ठ भारतही भावना साजरा करत  आहे, असे ते पुढे म्हणाले.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे

"हा #STSangamamगुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन बंध साजरे करत आहे. कित्येक शतकांपूर्वी गुजरातच्या लोकांनी तामिळनाडू हे त्यांचे घर बनवले होते आणि तिथली स्थानिक संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. तामिळ लोकांनीही त्यांचे खुल्या मनाने स्वागत केले होते. हा संगमम, एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना साजरी करत आहे.’"

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908628) Visitor Counter : 138