पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या 100 दिवसांच्या उलट गणती सुरु होत असून त्यानिमित्ताने 3-दिवसीय योग महोत्सव 2023 मध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2023 11:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना तीन दिवसीय योग महोत्सव 2023 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या 100 दिवसांच्या उलट गणती आजपासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें आहे. तीन दिवसीय योग महोत्सव 2023 नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 13-14 मार्च रोजी तर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था येथे 15 मार्च रोजी आयोजित केला जाणार आहे.
आयुष मंत्रालयाचे एक ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“योग दिनाला शंभर दिवस उरले असताना, हा दिवस उत्साहाने साजरा करण्याचे तुम्हा सर्वांना आवाहन करतो. आणि, जर तुम्ही योगाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवले नसेल, तर ते लवकरात लवकर करा.”
***
Jaydevi/ S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1906278)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam