युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्या पंजाब मधील रोपर येथून युवा उत्सव-इंडिया@2047 चे उदघाटन करणार


पहिल्या टप्प्यात देशभरातील 150 जिल्ह्यांमध्ये युवा उत्सव आयोजित केला जाणार

Posted On: 03 MAR 2023 2:40PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर 4 मार्च 2023 रोजी पंजाबमधील रोपर येथून युवा उत्सव-इंडिया@2047 चे उदघाटन  करतील. तसेच यावेळी अनुराग ठाकूर यांच्या हस्ते युवा उत्सवाच्या डॅशबोर्डचे लोकार्पण देखील होईल.

युवा उत्सव 4 मार्च 2023 रोजी प्रतापगड (उत्तरप्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड), धार आणि होशंगाबाद (मध्य प्रदेश), हनुमानगड (राजस्थान), सरायकेला (झारखंड), कपूरथला (पंजाब), जळगाव (महाराष्ट्र), विजयवाडा (आंध्र प्रदेश), करीमनगर (तेलंगणा), पलक्कड  (केरळ), कुडालोर (तामिळनाडू) येथे एकाच वेळी आयोजित केला जाईल.

पहिल्या टप्प्यात 31 मार्च 2023 पर्यंत देशभरातील 150 जिल्ह्यांमध्ये युवा उत्सवाद्वारे युवा शक्तीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र संघटना या  प्रमुख युवा संघटनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये "युवा उत्सव -इंडिया @2047" कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.  युवा शक्तीच्या या देशव्यापी उत्सवाचे स्वरूप 3-स्तरीय असून मार्च ते जून 2023 या कालावधीत एक दिवसीय जिल्हास्तरीय युवा उत्सवाने याचा प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाचा पहिला टप्पा चालू आर्थिक वर्षात 4 मार्च ते 31 मार्च 2023 या कालावधीत 150 जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये करत आहेत. यात युवा स्वयंसेवक आणि नेहरू युवा केंद्र संघटनेशी संलग्न युथ क्लबच्या सदस्यांव्यतिरिक्त आसपासच्या  शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी होणार आहेत.

जिल्हा स्तरावरील विजेते राज्यस्तरीय युवा उत्सवात सहभागी होणार आहेत आणि राज्यांच्या राजधानीमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 दरम्यान या 2-दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व राज्यस्तरीय कार्यक्रमातील विजेते दिल्ली येथे ऑक्टोबर 2023 च्या 3/4 थ्या  आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील युवा उत्सवात सहभागी होतील.

युवा कलाकार, लेखक, छायाचित्रकार, वक्ते तीन पातळ्यांवर स्पर्धेत भाग घेतील आणि पारंपारिक कलाकार देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतील. युवा महोत्सवाची संकल्पना असेल पंचप्रण :

विकसित भारताचे ध्येय,

गुलामगिरी किंवा वसाहतवादी मानसिकतेची कोणतेही खूण पुसून टाकण्यासाठी,

आपल्या वारशाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगा,

एकता आणि एकजूट, आणि

नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना.

युवा सहभागी 5 संकल्पांमधे (पंच प्रण) अध्याहृत अमृतकालाची दृष्टी सार्वजनिक मंचावर मांडतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या या भव्य सोहळ्यासाठी "युवा शक्तीतून जनभागिदारी” ही भारत@2047 पर्यंत प्रेरक शक्ती असेल.

15 ते 29 वयोगटातील युवक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम/स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत आणि प्रत्येक टप्प्यावरील विजेते पुढील स्तरावर जातील.

 

युवा उत्सवाचे घटक :

तरुण कलाकार प्रतिभा शोध ( टॅलेंट हंट)- चित्रकला:

युवा लेखक प्रतिभा शोध (टॅलेंट हंट) -

छायाचित्रण प्रतिभा शोध (फोटोग्राफी टॅलेंट हंट):

वक्तृत्व स्पर्धा

सांस्कृतिक महोत्सव- समूह कार्यक्रम:

युवा उत्सवाचा एक भाग म्हणून, विविध मंत्रालये, राज्य सरकारांचे विभाग/एजन्सी आणि पीएसयू त्यांची कामगिरी आणि नवोन्मेष देशातील तरुणांपुढे मांडतील. युवा उत्सवाच्या मुख्य घटकांव्यतिरिक्त, विविध मंत्रालये आणि विभागांच्या समन्वयाने भारत सरकारच्या विविध योजनांच्या कामगिरीचे दर्शन घडवण्यासाठी खालील संबंधित प्रदर्शनासह प्रात्यक्षिक स्टॉल्सचेही नियोजन करण्यात आले आहे. युवा उत्सव कार्यक्रमासोबत नियोजित काही स्टॉल्स पुढीलप्रमाणे आहेत:

फिट इंडिया स्टॉल्स आणि खेळ

प्रदर्शन आणि ड्रोन प्रात्यक्षिक

ग्रामविकास विभागाचे स्टॉल

एमएसएमई आणि वित्तीय सेवा विभागांचे स्टॉल्स

o  5G तंत्रज्ञान प्रात्यक्षिक

कृषी विभागाचे स्टॉल

आरोग्य विभागाचे स्टॉल

वारसा स्टॉल्स

कौशल्य विकास स्टॉल्स

सांस्कृतिक कार्यप्रदर्शन

ब्लॉक चेन प्रमाणपत्रे

वीर गाथा- जिल्ह्यातील अज्ञात नायक

भारत हे युवकांचे आणि प्राचीन इतिहासाचे राष्ट्र आहे. देशाचा प्रदीर्घ इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती, समृद्ध वारसा आणि भक्कम परंपरा हा सांस्कृतिक राजवारसा आहे. त्या आधारे देशाच्या स्वातंत्र्य शतकोत्सवा दरम्यान तरुण नागरिक भारत@2047 चे स्वप्न साकार करतील.

भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याचे स्मरण करत आहे - स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष, आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास, पंच प्रण मंत्रअमृतकालातील भारत@2047 ची दृष्टी भारताला विकसित देशांच्या पंक्तीत नेण्यासाठी सज्ज आहे.

***

S.Thakur/S.Kane/V.Ghode/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903869) Visitor Counter : 158