पंतप्रधान कार्यालय
उर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा
Posted On:
17 FEB 2023 10:28AM by PIB Mumbai
उर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ऑईल इंडिया कंपनीतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. ‘ओपन एकरेज लायसन्सिंग’ म्हणजेच खुल्या एकरी परवाना धोरणाअंतर्गत ऑईल इंडिया कंपनीने नुकतेच ओडिशामधील महानदीच्या खोऱ्यात पुरी-1 या तेलशोधक विहिरीचे परिचालन सुरु केले, त्यासंदर्भात पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा ट्विट संदेश सामायिक करुन पंतप्रधान त्यांच्या ट्विट संदेशात म्हणतात:
“हा अत्यंत उल्लेखनीय उपक्रम आहे आणि उर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांना यातून आणखी स्फूर्ती मिळत आहे.
***
SuvarnaB/SanjanaC/DY
(Release ID: 1900102)
Visitor Counter : 214
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam