पंतप्रधान कार्यालय
भारतीय वायुसेनेने स्वावलंबनाच्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर सहयोग आणि भागीदारीसाठी भारतातील शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक समुदाय आणि उद्योगजगताला केले आमंत्रित
भारतातील बुद्धिवाद्यांसाठी आणि गतिशील उद्योजकांसाठी ही मोठी संधी असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
13 FEB 2023 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
भारतीय वायुसेनेने स्वावलंबनाच्या आपल्या ध्येयनिश्चितीच्या मार्गावर सहयोग आणि भागीदारीसाठी भारतातील शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक समुदाय आणि उद्योग जगताला आमंत्रित केले आहे. एरो इंडिया 2023 च्या पूर्वसंध्येला एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टसाठी (स्वारस्य अभिव्यक्ती साठी) 31 आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या कुशाग्र बुद्धिवाद्यांसाठी आणि गतिशील उद्योजकांसाठी स्वावलंबनाच्या या मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भागीदार बनण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवाई दलाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"आत्मनिर्भरतेच्या या मोहिमेमध्ये आणि तेही संरक्षण क्षेत्रातल्या, ज्याचा आपल्या देशाला नेहमीच अभिमान आहे, भारतातल्या बुद्धिवाद्यांसाठी आणि गतिशील उद्योजकांसाठी या महत्त्वपूर्ण मोहिमेत भागीदार बनण्याची ही एक उत्तम संधी आहे."
S.Bedekar/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898748)
Visitor Counter : 211
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam