पंतप्रधान कार्यालय
अनेक अभिनव संशोधने केल्याबद्दल तसेच नवी आव्हाने पेलल्याबद्दल पंतप्रधानांनी देशातील डॉक्टर समुदायाची केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2023 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
वैद्यकीय जगतातील अभिनव संशोधनांच्या क्षेत्रात सदैव आघाडीवर राहिल्याबद्दल आणि नव्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील डॉक्टर समुदायाची प्रशंसा केली आहे. भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी शारीरिकदृष्ट्या अधू झालेल्या रुग्णांवर चार ठिकाणी सांधे बदलाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. अशा पद्धतीची ही ओडिशा येथे झालेली पहिलीच तर जगातील दुसरी शस्त्रक्रिया आहे.
भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयातर्फे करण्यात आलेल्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पाठवलेल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“वैद्यकीय जगतात अनेक अभिनव संशोधने केल्याबद्दल तसेच नवी आव्हाने पेलल्याबद्दल आपल्या डॉक्टरांचे अभिनंदन. त्यांच्या कौशल्याचा अत्यंत अभिमान वाटतो आहे.”
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898717)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam