गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार-2023


Posted On: 23 JAN 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2023

 

2023 या वर्षासाठी आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाष चंद्र बोस  आपत्ती व्यवस्थापन  पुरस्कारासाठी संस्थात्मक श्रेणीतून ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लुंगलेई अग्निशमन केंद्र, मिझोराम, यांची निवड झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या अमूल्य योगदानाची आणि निःस्वार्थ सेवेची दखल घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी "सुभाष चंद्र बोस  आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार" हा वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला म्हणजेच  23 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो. संस्थेसाठी 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र तर व्यक्तीसाठी  5 लाख रुपये रोख आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाने आपत्ती व्यवस्थापन पद्धती, सज्जता, आपत्तीशमन आणि प्रतिसाद यंत्रणेत लक्षणीय सुधारणा केली आहे ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींदरम्यान होणार्‍या जीवितहानीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893061) Visitor Counter : 1256