गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आदरणीय माताजी हिरा बा यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दु:खद बातमी आहे
आई ही माणसाच्या आयुष्यातील त्याची पहिली मैत्रीण आणि गुरू असते,आई गमावण्याचे दुःख हे नि:संशय सर्वात मोठे दुःख असते.
हिरा बा यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे आणि त्यांचे त्यागपूर्ण तपस्वी जीवन नेहमीच आपल्या स्मरणात राहील.
या दुःखद प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या परिवारासोबत उभा आहे,करोडो लोकांच्या प्रार्थना पंतप्रधानांच्या पाठीशी आहेत.
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2022 9:35AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आपल्या ट्विटर संदेशात श्री अमित शहा म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदरणीय माताजी हीरा बा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आई ही माणसाच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण आणि गुरुजी असते, आई गमावण्याचे दुःख हे निःसंशयपणे सर्वात मोठे दुःख असते.
हिरा बा यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले.त्यांचे त्यागपूर्ण तपस्वी जीवन सदैव आपल्या स्मरणात राहील.या दुःखद प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे. करोडो लोकांच्या प्रार्थना पंतप्रधानांसोबत आहेत.
ओम शांती!
***
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887461)
आगंतुक पटल : 282