पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतनिधीची घोषणा

Posted On: 29 DEC 2022 10:55AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपये मदतनिधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

"आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका सार्वजनिक सभेत झालेल्या दुर्घटनेमुळे दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबीयां प्रति सहवेदना. जखमी लवकर बरे होवोत. प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल.  जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi"

 

 

* * *

G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887196)