पंतप्रधान कार्यालय
विजय दिनानिमित्त, 1971 च्या युद्धातल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी सशस्त्र दलांना केले नमन
Posted On:
16 DEC 2022 11:18AM by PIB Mumbai
पाकिस्तानविरोधात 1971 साली झालेल्या युद्धात भारतानं अतुलनीय विजय मिळवला होता. त्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जात आहे. या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला विजय मिळवून देणाऱ्या सशस्त्र दलाच्या सर्व शूर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमन केले आहे.
पंतप्रधानांचा ट्विटर संदेश;
"विजय दिनानिमित्त मी सशस्त्र दलाच्या त्या सर्व शूर जवानांना नमन करतो . या जवानांनी 1971 च्या युद्धात भारताला एक देदिप्यमान विजय मिळवून दिला होता. देशाला सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यात सशस्त्र दले महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्याबद्दल संपूर्ण देश कायमच ऋणी राहील.
***
Nilima C/Sushama K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884053)
Visitor Counter : 240
Read this release in:
Telugu
,
Kannada
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam