पंतप्रधान कार्यालय

सुप्रसिद्ध मराठी लावणीगायिका, सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 10 DEC 2022 6:00PM by PIB Mumbai

 

सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु: व्यक्त केले आहे

यासंदर्भात केलेय  एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणतात; -

"महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला, विशेषतः लावणी गायकीला प्रसिद्ध करण्यासाठी, भावी  पिढ्या, सुलोचना ताई चव्हाण यांचे स्मरण करतील. संगीत आणि नाट्यकलेचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या निधनाने  दु: झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1882370) Visitor Counter : 173