पंतप्रधान कार्यालय
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आजपासून सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ब्लॉग द्वारे व्यक्त केले मनोगत
"भारताचे जी-20 चे अध्यक्षपद संरक्षण, सद्भाव आणि आशा यांचे अध्यक्षपद व्हावे, याकरता आपण एकत्र येऊ या"
Posted On:
01 DEC 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2022
भारत आज जी-20 चे अध्यक्षपद ग्रहण करतभारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आजपासून सुरुवात होत असून या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगद्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे :
'भारत जी-20 चे अध्यक्षपद ग्रहण करत असताना पंतप्रधानांनी ब्लॉग द्वारे व्यक्त केले मनोगत'
"भारताचे जी-20 चे अध्यक्षपद समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे ध्येय"
''एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’
''जगासमोर असलेल्या अनेक महाकाय आव्हानांचे निराकरण एकमेकांसोबत काम करून होणार आहे.''
"भारत हा जगाची सूक्ष्म प्रतिकृती आहे.''
''सामूहिक निर्णय घेणारी सर्वात प्राचीन ज्ञात परंपरांची संस्कृती या नात्याने भारताचे लोकशाहीच्या गुणसूत्रांमध्ये लक्षणीय योगदान आहे.''
''तंत्रज्ञानाचा लाभ नागरिकांच्या कल्याणासाठी''
''आमची प्राथमिकता आपली सर्वांची 'एक पृथ्वी' अधिक उत्तम करण्यावर केंद्रित असेल, आपल्या 'एका कुटुंबात' सुसंवाद वाढवण्यावर असेल आणि आपल्या 'एकत्रित भविष्याला' आशेचा किरण दाखवण्यावर असेल. ''
''भारताचा जी 20 अजेंडा सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक असेल.''
''भारताचे जी 20 चे अध्यक्षपद संरक्षण, सद्भाव आणि आशा यांचे अध्यक्षपद व्हावे, याकरता आपण एकत्र येऊ या. ''
पंतप्रधानांनी @narendramodi वरील तपशील देखील शेअर केला आणि G20 देशांच्या नेत्यांपर्यंत संदेश पाठवला
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे
'भारत आज जी 20 चे अध्यक्षपद ग्रहण करत असताना आगामी वर्षात आपण सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक अजेंडा राबवून जागतिक कल्याण साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करू इच्छितो या विषयी काही विचार मांडले आहेत.'
@JoeBiden @planalto
आता आणखी पुढे जाण्यासाठी आणि संपूर्ण मानवतेच्या फायद्यासाठी मूलभूत मानसिकतेत परिवर्तन घडवून आणण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, असा माझा ठाम विश्वास आहे.#G20India
@MohamedBinZayed @AlsisiOfficial @RishiSunak @vonderleyen
ही वेळ जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित येण्याची आणि एकतेची शिकवण देणाऱ्या आपल्या अध्यात्मिक परंपरांपासून प्रेरणा घेण्याची आहे. #G20India
@sanchezcastejon @KumarJugnauth @BDMOFA @President_KR”
संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी: भारताच्या जी-20 अध्यक्षीय कार्यकाळाचा आज प्रारंभ
* * *
S.Kakade/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880234)
Visitor Counter : 288
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam